महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. Read More
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून कायद्यानुसार आणि शहर हिताचे काम होत असतानाच त्यांची मुदतपूर्व बदली झाल्याने मुंढे समर्थक संतप्त झाले आहेत. दत्तक पित्याकडून नाशिककरांची फसवणूक असल्याचा आरोप सोशल मीडियावर करण्यात येत असून, याच्या निर्णयाच्या ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या मात्र, त्यांनी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन काम केले असते तर अशी वेळ आली नसती. लोकप्रतिनिधी ही लोकहिताचीच कामे घेऊन येतात. त्यामुळे त्यांची कामे टाळण्यापेक्षा आयुक्तांनी सकारात्मक भूमिका ...
महापालिकेचे नुतन आयुक्त म्हणून येऊ घातलेले राधाकृष्ण गमे यांनी नाशिकमध्ये यापूर्वी निवासी जिल्हाधिकारी आणि अतिरीक्त आयुक्त म्हणून कामकाज केले आहे. मुळचे अहमदनगरचे असलेले गमे हे नाशिकचे जावई देखील आहेत. ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील संघर्ष सुरूच आहेत. महासभेत मुंढे यांना टोमणे, तर आयुक्तांकडून काही पदाधिकाऱ्यांना केली जाणारी परतफेड सुरू असतानाच आयुक्तांना महासभेत महापौरांच्या आदेशावरून बोलण्यावरून शाब्दिक वादही झडले. ...
शहरातील मिळकतींचे खासगी एजन्सीमार्फत सर्वेक्षण करण्यात येत असून, आत्तापर्यंत ३ लाख ३० हजार मिळकतींचे सर्वेक्षण झाले असून, त्यातील २ लाख ६९ बेकायदा किंवा अतिक्रमित बांधकाम झाल्याची धक्कादायक माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली. ...
सातपूर विभागातील कामगारनगरजवळ असलेल्या स्वागत हाइट या इमारतीची उंची अवघी सहा इंच वाढल्याने महापालिकेने दोन महिन्यांपासून पाणीपुरवठा खंडित केला असून, तो पूर्ववत करावा, या मागणीसाठी सत्तारूढ आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला. ...
नेहरू उद्यानाचे लोकार्पण लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता उरकल्याच्या मुद्द्यावरून प्रशासन व सत्ताधाऱ्यांतील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर येऊन गेली आहे. आयुक्तांबद्दलच्या विरोधाला मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी टोलावले, पण त्यातील संकेत लक्षात घेतला गेला नाह ...
महापालिकेने काही वर्षांपूर्वी सुरू केलेल्या मिळकत सर्वेक्षणात शहरातील २ लाख ६९ हजार मिळकतींत अतिक्रमण झाल्याची धक्कादायक माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उच्च न्यायालयात सादर केल्याच्या चर्चेने सध्या अस्वस्थता निर्माण झाली आहे. ...