महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. Read More
मुंढे यांच्यामुळे नाशिक महापालिकेला आर्थिक शिस्त लागू पाहात होती. ती कायम राखत लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून काम करायचे तर ते सहज-सोपे नाही. एकाचवेळी उत्पन्नाचे भान ठेवून साऱ्यांची मर्जी सांभाळणे शक्य नसते. नूतन आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासाठी तेच कस ...
तुकाराम मुंढे यांच्या समर्थकांच्या दृष्टीने त्यांची प्रत्येक ठिकाणी होणारी कामगिरी ही लोकहिताचीच असते, परंतु असे असेल तर मग नाशिकमध्ये एकदा नव्हे तर दोन ते तीन वेळा मुंढे यांच्या पाठीशी राहण्यासाठी इतका अत्यल्प प्रतिसाद कसा, लोकांना मुंढे रूचले नाहीत ...
अखेर शासनाने उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण व्ही. गमे यांची आयुक्तपदी नियुक्तीचे आदेश बुधवारी (दि.४) दिले. गमे यांचा जिल्हाधिकारी पदाचा पदभार दिपा मुधोळ-मुंडे यांना सोपविण्यात आला आहे. ...
राज्याच्या साखर आयुक्तपदी वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती करावी अशी मागणी ऊस दर नियंत्रण मंडळाचे सदस्य व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्रल्हाद इंगोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे मुख्य सचिव डी के जैन यांच्याकडे निव ...
महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करावी, यासाठी गुरुवारी (दि.२९) मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंढे समर्थकांच्या भूमिकेला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर तसेच अतुल पेठे यांच्यासह अन्य अनेकांनी पाठिंबा दिला आहे. ...
महापालिकेच्या आयुक्तपदी कोण? याचे उत्तर अधांतरी असताना दुसरीकडे बदली झालेल्या तुकाराम मुंढे यांचे समर्थक रस्त्यावर उतरण्यासाठी आक्रमक झाले असून, शक्तिप्रदर्शनासाठी सोशल मीडियावर जोर धरला आहे. ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची ज्या तडकाफडकी राज्य शासनाने बदली केली, त्या तुलनेत त्यांच्या जागी नियुक्तीबाबत मात्र तत्परता दाखवली नाही. यामुळे आयुक्तपदी कोणाची वर्णी लागते यावर दिवसभर शहरात चर्चा सुरू होत्या. ...