महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. Read More
अयोध्यानगर येथील ३०० मीटर रस्त्याच्या निकृष्ट डांबरीकरण प्रकरणी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कंत्राटदारासह संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ...
: नागपूर महापालिकेतील विविध विभागांच्या कामात सुसूत्रता यावी आणि कार्य अधिक पारदर्शीपणे व्हावे, यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उपायुक्त दर्जापर्यंतच्या अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या नव्याने निश्चित केल्या आहे. ...
तुकाराम मुंढे यांनी २८ जानेवारीला महापालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली. त्यांनी ६२ बाजारातील चार हजारांहून अधिक भाजी विक्रेते व फेरीवाल्यांवर कारवाई करीत शहरातील रस्ते मोकळे केले. यामुळे रहदारी सुरळीत झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ...
बाजारातील विक्रेत्यांना शिस्त लावण्याला कोणाचाही विरोध नाही. परंतु अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली त्यांचा रोजगार हिरावू नका, अशी भूमिका आमदार प्रकाश गजभिये यांनी बुधवारी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याची चर्चा करताना मांडली. ...
मालमत्ता कर हा महापालिकेचा मुख्य आर्थिक स्त्रोत असल्याने महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी थकबाकीदारांच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. थकीत कर भरा अन्यथा कारागृहात जाल असा इशारा त्यांनी दिला आहे. ...
नगरसेवकांना आयुक्त भेटीसाठी वेळ देत नसल्याच्या तक्रारी आहेत. ही भूमिका योग्य नाही. आयुक्तांनी त्यांना भेटीसाठी वेळ देणे आवश्यक आहे. यासंदर्भात आयुक्तांशी चर्चा करणार असल्याची माहिती महापौर संदीप जोशी यांनी शनिवारी दिली. ...
बुधवारी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी लेखा व वित्त विभागाला आकस्मिक भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. यात अनियमितता निदर्शनास आल्याने चार कर्मचाऱ्यांना कारणे द्या नोटीस बजावण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. ...