महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. Read More
नाशिक : तुकाराम मुंढे यांच्या नऊ महिन्यांच्या वादग्रस्त कारकिर्दीनंतर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. गमे आले आता ‘गम’ (दु:ख) नाही अशी त्यांच्या स्वागतपर भाषणे झाली. परंतु नंतर आता असे काय झाले की गमे म्हणजे ‘गम ...
शाळेतील विद्यार्थ्यांसारखा ड्रेस कोड अनिवार्य करावा, असे मला योग्य वाटत नाही. अशा स्वरूपात आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुधवारी कर्मचारी व अधिकाऱ्यांचा क्लास घेतला. ...
‘आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या’अशी नागपूर महापालिकेची अवस्था आहे. याचा विकास कामांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने, आयुक्तांपुढे आर्थिक आव्हान उभे ठाकले आहे. ...