ठाण्यात दोन दिवसात तीन कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या ही १४ झाली आहे. त्यातही त्या वैद्यकीय सेवा देणाऱ्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याबरोबरच कळव्यातील एक खाजगी रुग्णालय देखील पालिकेने आता सील केले आहे. ...
महिन्याची एक तारीख उलटून गेली आणि आता पैसे काढण्यासाठी, पगार तपासण्यासाठी, पीएफचे पैसे काढण्यासाठी बँकाच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र ठाण्यातील अनेक बँकाच्या ठिकाणी दिसून येत होते. यामध्ये जेष्ठ नागरीकांचा समावेश अधिक असल्याचे चित्र दिसत ...
शहरातील खाजगी डॉक्टरांसाठी इंडियन मेडीकल असोसिएशनच्या वतीने मास्क , सॅनिटायझर, ग्लोज आणि गॉगल्सचे वाटप करण्यात आले. यावेळी शहरातील १५० डॉक्टरांनी याचा लाभ घेतला. यावेळी सोशल डिस्टेसींगचे पालन करण्यात आले. ...
कोरोनाशी लढा देतांना अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आपणही काही तरी करु शकतो या उद्देशाने ठाणे परिवहन सेवेमार्फत २३ मार्च पासून मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यानुसार आतापर्यंत या बसेसमधून २६ हजार ६७२ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचा ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक वाहतुक वगळता इतर वाहतुक बंद झाल्याने ठाणे शहरातील हवेतील प्रदुषणातही कमालीची घट झाल्याचे दिसून आले आहे. शहरातील हवेतील अतिप्रदुषित असलेल्या ठिकाणांचे प्रदुषणात ४० टक्यांची घट झाल्याचे दिसून आले आहे. ...
हातावरील पोट असणाऱ्या हजारो रिक्षावाल्यांवर सध्या कोरोनामुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांना मदत मिळावी अशी माफक अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. ...
नागरीकांनी सोशल डिस्टेन्सींगचा नियम न पाळल्याने अखेर पालिकेने अवघ्या दोनच दिवसात सेंट्रल मैदान येथे स्थलांतरीत केलेली भाजी मंडई हलविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता शुक्रवार पासून जांभळी नाक्यावरील तीन रस्त्यांवर आता नव्याने परवानगी देण्यात आली ...
ठाणेकरांसाठी दिलासा देणारी बातमी पुढे आली आहे. मागील ४८ तासात ठाण्यात नव्याने कोरोना रुग्णाची नोंद झालेली नाही. परंतु क्वॉरन्टाइनची संख्या वाढत आहे. पालिकेने खरबदारीचे उपाय हाती घेतले असून समस्त ठाणेकरांना घरीच राहण्याचे आवाहन केले आहे. ...