कोरोना बाधीत रुग्णांची सेवा करता करता एका वैद्यकीय सेवा देणाऱ्या महिला कर्मचाऱ्यालाच कोरोनाची लागण झाली आहे. तिच्यावर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. परंतु आधी पैसे भरा मगच उपचार करु असा तगादा या रुग्णालयाकडून महिलेकडे लावला जात आहे. ...
ठाणे पूर्व हा भाग मागील महिनाभर कोरोनापासून दूर होता. त्यामुळे तो ग्रीन झोन म्हणून पालिकेने घोषीत केला होता. मात्र मागील काही दिवसात या भागात कोरोनाचे तब्बल ११ रुग्ण आढळल्याने हा भाग ग्रीन झोन मधून थेट रेड झोनमध्ये आला आहे. ...
कोरोनावर मात करीत अखेर १४ दिवसानंतर परांजपे दामपत्याची घर वापसी झाली आहे. सोसायटीमधील नागरीकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे जोरदार स्वागत केले. आता पुढील १२ मे पर्यंत ते होम क्वॉरन्टाइन असणार आहेत. ...
ठाण्यात महापालिकेने क्वॉरन्टाइन केलेल्यांचे हाल अद्यापही संपले नसल्याचेच दिसत आहे. एक लीटरची पाण्याची बॉटल दोन दिवस पुरवून घ्यावी लागत आहे. खाण्या, बरोबर इतरही सुविधा मिळत नसल्याने येथील नागरीक हैराण झाले आहेत. ...
ठाणे शहरातील सोसायटीधारकांना शिस्त लावण्यासाठी पालिकेने आता सोसायटींसाठी एक नियमावली तयारी केली आहे. या माध्यमातून सोसायटींमधील सदस्यांनी नियमावलींचे उल्लंघन केल्यास सोसायटीच्या अध्यक्ष आणि सचिवांवर गुन्हे दाखल केले जातील असे पालिकेने स्पष्ट केले आहे ...
लोकमान्य नगर भागातील मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांची आता तपासणी सुरु असतांनाच कळवा रुग्णालयातील एका महिला वैद्यकीय कर्मचाºयाला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिच्या संपर्कातील ६० वैद्यकीय कर्मचारी आता हायरीस्कमध्ये आले असून ...
कोरोनामुळे शहरातील अनेक अत्यावश्यक कामे ठप्प झाली असतांनाच आता त्याचा फटका महापालिकेच्या नालेसफाईच्या कामालाही बसल्याची बाब समोर आली आहे. महापालिकेने काढलेल्या नालेसफाईच्या कामांच्या निविदेला ठेकेदारांनी प्रतिसादच न दिल्याने पालिकेला आता फेरनिविदा का ...
लॉकडाऊनमध्ये ईडली ढोसा तयार करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशातच त्यांना अखिल भारतीय कोळी समाज संघटनेने मदतीचा हात पुढे केला आहे. या संघटनेच्या वतीने धारावीतील १२०० नागरीकांना किराणा सामान देण्यात आले आहे. ...