ठाण्यात तीन दिवसात ९ रुग्ण बरे झाले असल्याने ही आनंदाची बातमी आहे. मात्र दुसरीकडे ठाण्यातील क्रांती नगर भागातील एका पाच महिन्याच्या आणि पारसिक नगर येथील एक वर्षीय बालकाला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
कोरोना बाधीत रुग्णांसाठी आणि इतरांसाठी ओपडी वेगळी ठेवण्यात यावी असे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले आहेत. या संदर्भातील एक नियमावली तयार करण्यात आली असून ती बुधवार पासून लागू करण्यात आली आहे. ...
महापालिकेच्या भोंगळ कारभाराचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. ९२ वर्षीय कोरोना बाधीत वृध्द महिलेला चक्क पाच तास अॅब्युलेन्ससाठी ताटकळत राहावे लागले असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. ...
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून विलगीकरण कक्षात अनेक नागरीकांना ठेवले आहे. मात्र आठवडा उलटूनही येथील नागरीकांची तपासणी केली जात नाही. त्यांना वेळेवर अन्न मिळत नाही. इतर सुविधाही उपलब्ध होत नसल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...
कोरोनामध्ये लॉकडाऊनच्या काळात गोरगरीब नागरीकांना मदत मिळावी या उद्देशाने जाग या संस्थेच्या वतीने महापौरांना पत्र दिले असून नगरसेवकांचा नगरसेवक निधी या नागरीकांसाठी खर्ची करण्यात यावा अशी मागणी केली आहे. ...
लोकमान्य नगर भागातील मृत पावलेला तो नागरीक आता स्मशानभुमीतील कर्मचाऱ्यांच्याही संपर्कात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आता या कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. आमचीसुध्दा तपासणी करा अशी मागणी त्यांनी केली आहे. ...
जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतांना दुसरीकडे शहरातील तापमानातही आता वाढ होतांना दिसत आहे. ठाणे शहराचे तापमान आज ४१ अंश सेल्सीएसवर गेले होते. तर मागील दोन ते तीन दिवसापासून ठाण्यात घरगुती वीजेच्या वापरातही वाढ झाल्याचे दिसून आले आ ...
ठाणे जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ही ४२३ वर जाऊन पोहचली आहे. तर ठाण्यात कोरोनाबाधीत रुग्णांपैकी दोघांचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकाडा आता चारवर गेला आहे. तर डोंबिवलीतही आज एकाचा मृत्यु झाला आहे. तर जिल्ह्यात कोरोना बाधीत मृत्यु झ ...