अवनी (टी-१) वाघिणीला बंदुकीच्या गोळ्यांनी ठार मारल्यानंतर अनाथ झालेल्या तिच्या ११ महिन्यांच्या दोन बछड्यांना जेरबंद करण्यासाठी वनविभागाने सात पथके निर्माण केली असून युद्धस्तरावर या बछड्यांचा शोध घेतला जात आहे. ...
मुंबई-पुण्यात वातानुकूलित कक्षात बसून अवनीची पाठराखण करणे सोपे आहे. या पाठीराख्यांनी कोणत्याही गावात परिवारासह तीन दिवस मुक्काम करून पाहावा आणि शेतशिवारात जाऊन दाखवावे मग त्यांना वाघाची दहशत काय असते ते कळेल ...
अवनी या नावाने प्रसिद्ध असलेल्या वाघिणीला बेशुद्ध करून जेरबंद करण्यासाठी १७ सप्टेंबर २0१८ रोजी सुरू करण्यात आलेली मोहीम अखेर या वाघिणीच्या हत्येने संपुष्टात आली. ...
यवतमाळ जिल्ह्यात गेल्या अनेक महिन्यांपासून धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक वाघिणीला ठार केल्याच्या निषेधार्थ सोमवारी दुपारी २ वाजता नागपुरात युवा काँग्रेसतर्फे निदर्शने करण्यात आली. ...
१३ निष्पापांचे बळी घेणारी अवनी वाघिण तब्बल दीड महिन्यांपासून वन विभागाच्या पथकाला चकवा देत होती. प्रशिक्षीत हत्ती, श्वान पथक, पॅरा ग्लायडर यांनाही तिचा ठावठिकाणा लागत नव्हता. अखेर अनुभवी अधिका-यांनी क्लुप्ती योजली. ...