मागील हंगामातील उसाला ४०० रुपये व यंदाच्या हंगामात प्रतिटन ३,५०० रुपये द्यावेत, या मागणीसाठी रविवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांसह दक्षिण महाराष्ट्रात ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आले. ...
दोन दिवसांत एफआरपी द्या, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनाचा भडका उडाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी कारखानदारांना दिला आहे. ...
वर्षभरात सोयाबीनमधून शेतकऱ्यांना फारसे हाती काही लागले नाही. मात्र, आता दरात वाढ सुरू झाली आहे. क्विंटलला पाच हजारांपर्यंत भाव आहे, तर विदर्भात पाच हजारांचा टप्पा ओलांडलाय. ...
चालू हंगामात गाळप होणाऱ्या उसाला प्रतिटन किमान ३१०० रुपये पहिली उचल दिली जाईल, असे कारखानदारांनी मान्य केले. पण, मागील हंगामाचे बोला, मग चालूवर चर्चा करू, या भूमिकेवर शेट्टी ठाम राहिले. ...