सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे. Read More
विधानसभेत तांदूळ खरेदी संदर्भातील लक्षवेधी मांडताना सुधीर मुनगंटीवार आणि नाना पटोले यांनी गंभीर बाब मांडली. त्यावर अधिकाऱ्यांची मस्ती उतरवतो, असे उत्तर अजित पवारांनी दिले. ...
Farmer Loan Waiver Maharashtra: राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. भाजपने शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याचे आश्वासन विधानसभा निवडणुकीत दिले होते. ...
"आम्ही दर वर्ष निवृत्ती वेतन आणि पगारावर ३० हजार कोटींच्या जवळपास वाढ करतो. तुमच्या पैकी कुणीही त्यावर काही बोलत नाही. अडीच कोटी बहिणींना न्याय दिल्याबरोबर तुम्ही पत्रकारबंधूसुद्धा खडखडाट झाला खडखडाट झाला, असे म्हणता." ...
भाजपचे सात टर्मचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली असली तरी फॉर्म काही कमी झालेला नाही. मंत्रालयात शेतकऱ्यांवर अन्याय करणारा कोण वाल्मीक कराड हे ते शोधा, असा टोला त्यांनी हाणला. ...
कालपासून मी याच विचारात आहे की मला मंत्रिपद न देण्याचे कारण काय? ते समजले तर मलाही दुरुस्त करता येईल, अशी भावना मंत्रिपदाची संधी न मिळू शकलेले भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. ...