शासनाने ई-हक्क प्रणाली सुरू केली असून त्याअंतर्गत अकरा विविध सेवा ऑनलाईन दिल्या जात आहेत. त्यामुळे वारस नोंद इ करार, कर्जाचा बोजा चढविणे अशा कामांसाठी शेतकऱ्यांना यापुढे तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. ...
राष्ट्रीय सहकार विकास निगमने दिलेल्या कर्जाचा वापर राज्यातील ३० साखर कारखान्यांपैकी २४ कारखान्यांनी अटी, शर्तीचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले आहे. ...
विधानसभा आणि विधानपरिषदेत विरोधी पक्षनेतेपदासाठी विरोधक संघर्ष करत असताना आता विरोधी पक्षांच्या प्रतोदांना मिळणारा मंत्रिपदाचा दर्जा तसेच त्या अनुषंगाने मिळणाऱ्या इतर सुविधांपासून वंचित राहावे लागणार आहे. ...
महाराष्ट्राची शेतीची परंपरा पर्यटकांपर्यंत पोहोचवावी, यातून पर्यटकांची निसर्गाशी नाळ जोडली जावी, तसेच या क्षेत्रात तरुणांना रोजगाराची संधी मिळावी, या हेतूने महाराष्ट्र शासनाने कृषी पर्यटन धोरण राबविण्यास मान्यता दिली आहे. ...