राज्यातील दुष्काळस्थिती निर्माण झालेल्या भागाचा दौरा करून शेतकरी, पशुपालक, लोकप्रतिनिधींची भेट घेण्यात येणार आहे. प्रत्यक्ष पीक नुकसानाची पाहणी केंद्रीय पथकाद्वारे करण्यात येणार आहे. ...
परतीच्या पावसाने ओढ दिल्याने राज्यातील रब्बी पिकांची पेरणी झालेल्या क्षेत्रावर मोठा परिणाम झाल्याचे चित्र आहे. दोन महिने उलटून गेले तरी राज्यात सरासरीच्या केवळ ३२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ...
विम्याच्या अग्रीम रक्कमचे वाटप वेगाने सुरु असून आतापर्यंत ४७ लाख ६३ हजार नुकसान भरपाई अर्जांना मंजुरी मिळाली असून १ हजार ९५४ कोटी रुपये वाटप होणार आहेत. यापैकी ९६५ कोटी रक्कम वितरीत करण्यात आली असून उर्वरित रक्कम वितरीत करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. ...
नोव्हेंबर महिन्यात रब्बीच्या बहुतांशी पेरणीची कामे होत असताना यंदा मात्र केवळ २८ टक्क्यांपर्यंतच पेरणी झाल्याने आगामी काळात उत्पादन घटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ...