lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > तयारी खरीपाची; २५ मे पासून रोहिणी नक्षत्र पाऊस येईल?

तयारी खरीपाची; २५ मे पासून रोहिणी नक्षत्र पाऊस येईल?

Preparation for Kharif from 25th May Rohini Nakshatra will rain? | तयारी खरीपाची; २५ मे पासून रोहिणी नक्षत्र पाऊस येईल?

तयारी खरीपाची; २५ मे पासून रोहिणी नक्षत्र पाऊस येईल?

खरिपाच्या पेरणी किंवा टोकणी करिता रान तयार करण्यात येत आहे. उसाची खोडकी, कसपटे वेचून ती नष्ट केली जात आहेत. जमीन भिजवून भूईपाटाने पाणी देऊन आगाप सोयाबीन पेरणी किंवा टोकणी अक्षय तृतीया दिवशी १० मे पासून करण्यासाठी शेतकरी तयारीत आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

वाळवा : मे महिन्यात आगाप सोयाबीन व भात पीक घेतले जाते. त्यासाठी जमिनीत मशागतीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. २५ मे पासून रोहिणी नक्षत्र पाऊस सुरू होतो आहे. यावर्षी सरासरी पाऊस शंभर टक्के पेक्षा जास्त आहे, असे अनुमान वर्तविले आहे.

खरिपाच्या पेरणी किंवा टोकणी करिता रान तयार करण्यात येत आहे. उसाची खोडकी, कसपटे वेचून ती नष्ट केली जात आहेत. जमीन भिजवून भूईपाटाने पाणी देऊन आगाप सोयाबीन पेरणी किंवा टोकणी अक्षय तृतीया दिवशी १० मे पासून करण्यासाठी शेतकरी तयारीत आहेत.

वाळवा आणि परिसरातील शेतकरी जिथे भरपूर पाणी साचून राहते तिथे भात पीक घेण्यासाठी तयारी करत आहेत. यावर्षी पाऊस हमखास भरपूर आहे. उष्णता स्पष्ट करते की खूप मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झाले आहे ते पावसाच्या स्वरूपात ढासळणार आहे.

तसेच जून महिन्यात आडसाली ऊस लागवड करावी म्हणून सऱ्या सोडल्या जात आहेत. यावर्षी ऊस साखर कारखाने लवकर बंद झाले आहेत. त्यामुळे खोडवा पीक गेले बरोबर नांगरट करून रोटाव्हेटर मारून ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत केली आहे आणि सऱ्या सोडल्या आहेत.

ऊस लागवड करून त्यात अंतर्गत पिके म्हणून सोयाबीन व भुईमूग पीक घेण्यासाठी शेतकरी तयारीत आहे.

शेतकऱ्यांची तयारी
खरीप हंगामातील सोयाबीन, ज्वारी, बाजरी, मका, तूर, भुईमूग, हुलगा, भात पिके घेतली जातात. शक्यतो सोयाबीन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. ऊस शेतीमध्ये फेरपालटाची पिके म्हणून पश्चिम महाराष्ट्रात सोयाबीन पीक घेतले जाते. सोयाबीन व भुईमूग पीक घेण्यासाठी शेतकरी आपल्या शेतात सर्व तयारी करून बसला आहे.

अधिक वाचा: Monsoon 2024 शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता यंदा १०६ टक्के मान्सून; कधी कसा पडणार पाऊस

Web Title: Preparation for Kharif from 25th May Rohini Nakshatra will rain?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.