lokmat Supervote 2024
Lokmat Agro >हवामान > Monsoon 2024 शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता यंदा १०६ टक्के मान्सून; कधी कसा पडणार पाऊस

Monsoon 2024 शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता यंदा १०६ टक्के मान्सून; कधी कसा पडणार पाऊस

Monsoon 2024 Good news for farmers 106 percent monsoon this year; How will it ever rain? | Monsoon 2024 शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता यंदा १०६ टक्के मान्सून; कधी कसा पडणार पाऊस

Monsoon 2024 शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता यंदा १०६ टक्के मान्सून; कधी कसा पडणार पाऊस

भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय महोपात्रा यांनी पत्रकार परिषदेत देशभरातील मान्सूनची स्थिती कशी असेल, कोणत्या राज्यांमध्ये चांगला पाऊस आणि कुठे कमी पाऊस होईल, याबाबत माहिती दिली.

भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय महोपात्रा यांनी पत्रकार परिषदेत देशभरातील मान्सूनची स्थिती कशी असेल, कोणत्या राज्यांमध्ये चांगला पाऊस आणि कुठे कमी पाऊस होईल, याबाबत माहिती दिली.

शेअर :

Join us
Join usNext

दरवर्षी पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 'ला निना'च्या अनुकूल परिस्थितीमुळे यंदा देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने सोमवारी वर्तविला आहे.

यंदा मान्सून सामान्यपेक्षा जास्त आणि दीर्घ-काळाच्या सरासरीच्या (८७ सेंमी.) १०६ टक्के असेल, अशी माहिती पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रविचंद्रन यांनी दिली.

भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय महोपात्रा यांनी पत्रकार परिषदेत देशभरातील मान्सूनची स्थिती कशी असेल, कोणत्या राज्यांमध्ये चांगला पाऊस आणि कुठे कमी पाऊस होईल, याबाबत माहिती दिली. देशात ८० टक्के भागांत सरासरीहून अधिक पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने गेल्यावर्षी ९६ टक्के पावसाचा अंदाज दिला होता.

कधी किती पाऊस?
■ १९७१ ते २०२० पर्यंतच्या पावसाच्या सरासरीनुसार १ जून ते ३० सप्टेंबर दरम्यान देशात सरासरी ८७ सेंमी पाऊस पडतो.
■ यंदा मान्सूनच्या सुरुवातीच्या तुलनेत ऑगस्ट - सप्टेंबरमध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे महोपात्रा म्हणाले.

पावसाची वर्गवारी
९६ ते १०४% सामान्य
९० ते ९६% सामान्यपेक्षा कमी
१०५ ते ११०% सामान्यपेक्षा जास्त
निवडणुकीदरम्यान वादळाची शक्यता नाही; पण उष्णतेची लाट येऊ शकते. त्याबाबत आयोगाला माहिती दिली जाईल, असे महोपात्रा यांनी सांगितले.

महाराष्ट्रासह काही राज्यांत स्पष्ट संकेत नाहीत
■ हवामान विभागाने मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये मान्सूनच्या पावसाबद्दल स्पष्ट संकेत दिले नाहीत. हा भाग देशाचा 'मुख्य मान्सून विभाग' मानला जातो. येथील शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे.
■ देशभरात नैर्ऋत्य मान्सून अंतर्गत १ जून ते ३० सप्टेंबर दरम्यान मोसमी पाऊस सरासरी १०६ टक्के पडणे अपेक्षित आहे. जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
■ ईशान्येकडील आसाम, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ओडिशा, छत्तीसगड आणि झारखंडचा काही भाग आणि बंगालमधील गंगा खोऱ्यातही सामान्यपेक्षा कमी पाऊस अपेक्षित आहे.

सध्या एल निनो जात आहे आणि ला निनो येत आहे. नऊ वर्षांच्या आकडेवारीवरून ला निनोमुळे चांगला पाऊस झाल्याचे स्पष्ट होत आहे. यंदाही चांगला पाऊस होईल. मान्सूनसाठी सकारात्मक स्थिती असणार आहे. - डॉ. मृत्युंजय महोपात्रा, महासंचालक, हवामानशास्त्र विभाग

Web Title: Monsoon 2024 Good news for farmers 106 percent monsoon this year; How will it ever rain?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.