सोना मोहपात्रा बॉलिवूडची प्रख्यात गायिका आहे. ब्रँड मॅनेजर म्हणून काम करत असताना सोनाने अनेक जाहिरातींचे जिंगल्स बनवले. टाटा साल्टचे ‘कल का भारत है’ आणि क्लोज अपचे ‘पास आओ ना’ हे तिने बनवलेले जिंगल्स प्रचंड गाजलेत. डेली-बेली या चित्रपटातील ‘बेदर्दी राजा’ या गाण्यामुळे सोना लोकप्रिय झाली. यानंतर आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’ या शोमध्ये ती परफॉर्म करताना दिसली. आमिरच्याच ‘तलाश’ या चित्रपटातील ‘जिया लागे ना’ या गाण्याने तिला बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकांच्या रांगेत नेवून बसवले. Read More