चालकाच्या निष्काळजीपणामुळे अशोकनगर येथील अशोक इंग्लिश स्कूलच्या बसला मंगळवारी सकाळी अपघात झाला. झाडाला बस आदळल्याने मोठी दुर्घटना टळली. विद्यार्थ्यांना कोणतीही दुखापत न झाल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ...
बाजार समितीच्या कांदा अनुदानात अपहार झाल्याच्या तक्रारीची चौकशी धिम्या गतीने सुरू आहे. याप्रकरणी जिल्हा उपनिबंधकांनी पंधरा दिवसांत तपासणी पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश २२ डिसेंबरला दिले. मात्र, अजूनही माहिती जमा करण्याचे काम सुरू आहे. ...
पत्नीने जेवणामध्ये मटण केले नाही म्हणून पतीने अंगावर रॉकेल टाकून पत्नीस पेटवून दिल्याची घटना पटेलवाडी (ता. श्रीरामपूर) येथे घडली. गंभीररीत्या भाजलेल्या महिलेस साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ...
श्रीरामपूर बाजार समितीमधील गाळ्यांचा लिलाव शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी बंद पाडला. अखेर संचालक मंडळाने नमते घेत शेतक-यांसाठी चार गाळे राखीव ठेवण्याचा तसेच शेतमाल साठविण्यासाठी गोदाम बांधण्याचा आणि शेतक-यांना एक रुपयात जेवण देण्याचा निर ...
आदिवासी व अनुसूचित जाती-जमातीच्या दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थिनींना प्रती दिन एक रुपया उपस्थिती भत्ता दिला जातो. १९९२ पासून आजतागायत या प्रोत्साहन भत्त्यात कोणतीही वाढ झालेली नसताना हा रुपयादेखील वेळेवर मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. ...
बेलापूर-श्रीरामपूर रस्त्यावर बेलापूर खुर्दजवळ बुधवारी रात्री सव्वा बारा वाजता तीन वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात पाच तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. ...
श्रीरामपूर शहरात सर्वसामान्यांना परवडेल, अशा किमतीत घरे उपलब्ध करुन देण्यासाठी म्हाडाचा प्रकल्प सुरु आहे. या सदनिकांमधील ८० सदनिकांचे वितरण नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या हस्ते पोलिसांना करण्यात आले. ...
तालुक्यातील पढेगाव येथे कोळशाच्या भट्टीवर काम करणा-या दोघा मजुरांच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत रवींद्र याच्या वडिलांनी सोमवारी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दोघांचेही मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्या ...