कुकडीच्या आवर्तनास बुधवारी अखेर मुहूर्त निघाला. कुकडी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार बुधवारी १० मे पासून संध्याकाळी सहा वाजल्यापासून येडगाव धरणातून ५०० क्युसेसने पाणी सोडण्यात येणार आहे. ...
श्रीगोंदा तालुक्यातील ढोरजा, कोथूळ या भागात विस्तारलेल्या जंगलात सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास आगीचा वनवा भडकला. यामध्ये सुमारे तीनशे एकर जंगल जळून खाक झाले. आगीचे कारण अद्याप समजले नाही. ...
पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या एका गटाला दुस-या गटाने तुफान चोप दिला. श्रीगोंदा शहरातील मेहुण्यांमध्ये ही तुफान हाणामारी ठाणे अंमलदारासमोर झाली. एकमेकांना लाथा- बुक्याने तुफान हाणामार करण्यात आली. ही घटना शुकवारी चार वाजण्याच्या सुमारास घडली ...
तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी धान्य वाटप करण्यासाठी पॉस मशिनचा वापर न केल्याप्रकरणी तालुक्यातील दहा स्वस्त धान्य दुकानदारांना नोटिसा बजावल्यानंतर दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. ...
जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पावसाने तडाखा दिला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वा-यामुळे अनेक शाळांचे पत्रे उडून गेले. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही. ...
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील घोडेगाव येथे घडली. मात्र महिनापुर्वी घडलेल्या घटनेचा गुन्हा सोमवारी (१६ एप्रिल) दाखल करण्यात आला. ...
श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर जिल्हा कारागृहात १०९ कैदी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून कारागृहात आरोग्य अधिका-यांचे पद जिल्हा आरोग्य संचालनालयाने भरले नसल्याने येथील कैद्यांची आरोग्य धोक्यात आले आहे. ...
श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा खुल्या कारागृहाने शेती उत्पन्नात राज्यात दुसरा तर पश्चिम विभागात पहिला क्रमांक पटकावला आहे. कैदी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारागृहाची ७५ एकर शेती फुलवली आहे. ...