कर्जतचे कुकडी आवर्तन शुक्रवारी (दि. १९ जून) सकाळी बंद करण्यात आले आहे. श्रीगोंदा भागात या आवर्तनाचे पाणी सोडण्यात आले. यातूनच सीना लघु मध्यम प्रकल्पात काही प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याची माहिती जलसिंचन विभागाने दिली आहे. ...
सुरेगाव (ता.श्रीगोंदा) येथील आनंदाश्रम स्वामींचा समाधी सोहळा कोरोनामुळे २५ भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. ११ जूनपासून दररोज केवळ एकाच भाविकाला ज्ञानेश्वरी पारायणासाठी बसविण्यात आला होते. ...
पुणे जिल्ह्यात पाऊस झाला आहे. त्यामुळे घोड धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. १७ जूनअखेर घोड धरणात २८५ एमसीएफटी (६ टक्के) उपयुक्त साठ्यात पाणी आले आहे. ...
कोरोना लॉकडाऊनसंदर्भात नियम तोडणा-यांवर कारवाई करा. त्याचा अहवाल रोज पाठवा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी बुधवारी (दि.१७ जून) श्रीगोंदा येथे दिल्या. ...
मुंबईहून श्रीगोंदा तालुक्यातील कोंडेगाव येथे आलेल्या ८५ वर्षीय आजीबाईंना कोरोनाने घेरले. सोबतीला इतर आजारही होतेच. मात्र, मनाचा कणखरपणा, उपचारांना योग्य प्रतिसाद आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर या आजीबाई आज कोरोनातून बºया होऊन घरी परतल्या आहेत. ...
श्रीगोंदा तालुक्यातील नाभिक संघटना पदाधिकाºयातील मतभेद मंगळवारी झालेल्या आंदोलनादरम्यान उघडकीस आले. एका गटाने तहसील कार्यालयासमोर तर दुस-या गटाने संत सेनानी महाराज मंदिरात उपोषण केले. दोन्ही गटाने सलुनची दुकाने उघडण्याबाबत तहसीलदारांना निवेदन दिले. ...
श्रीगोंदा फॅक्टरी येथील १२० किलो वजनाच्या नागरिकाने दहा दिवसात कोरोनाला चितपट केले. रविवारी दुपारी श्रीगोंदा फॅक्टरी परतल्यानंतर नातेवाईकांनी पुष्पवृष्टी केली. कोण आला रे.. कोण आला.. श्रीगोंदा फॅक्टरीचा कोरोनायोध्दा आला ...अशी घोषणाबाजी करुन त्याचे स ...
श्रीगोंदा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अशोक खेंडके यांनी उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. खेंडके यांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्याकडे राजीनामा सुपुर्द केला आहे. ...