Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
Independence Day 2022: यंदा १५ ऑगस्ट रोजी श्रावणी सोमवार आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या दुहेरी शुभ मुहूर्तावर शिवभक्ती आणि देशभक्तीचा अपूर्व संगम साधता येणार आहे. इतर वेळेस आपण व्यक्तिगत स्वार्थासाठी देवाकडे प्रार्थना करतोच, आज आपल्या राष्ट्रासाठ ...
Shravan Somwar Vrat 2022: श्रावणात शंकर पूजेला अधिक महत्त्व असते. त्यात आपल्याला जर १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेता आले तर उत्तमच. या १२ ज्योतिर्लिंगांइतकेच राजस्थान येथील कोटा येथे एक शिव धाम आहे. तिथे एक दोन नाही तर ५२५ शिवलिंग आहेत. त्यांच्या दर्श ...
Raksha Bandhan 2022: यंदा ११ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी आपण आपल्या भाऊरायाला जितक्या प्रेमाने राखी बांधतो, तेवढ्याच प्रेमाने देवालाही राखी बांधतो. 'तुम ही हो बंधू, सखा तुम्ही' अशी सलगी देवाशी असल्यामुळे ऋणानुबंध दृढ करण्याचा हा एक ...
Raksha Bandhan 2022: 'तुझं माझं पटेना आणि तुझ्यावाचून करमेना' असं भावाबहिणीचं प्रेमळ नातं. इतर दिवशीच काय तर रक्षाबंधनाच्या दिवशीसुद्धा ते एकमेकांशी सरळ बोलतील याची खात्री पालकही देऊ शकत नाहीत. परंतु त्या गोड भांडणात प्रेमाची अवीट गोडी दडलेली असते. ब ...
Raksha Bandhan 2022: निर्जीव वस्तूंशीदेखील नाते जोडा अशी आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. त्याचेच अनुसरण करून वास्तुशास्त्र सांगते, ज्याप्रमाणे आपला भाऊ आपले संरक्षण करतो म्हणून त्याला आपण राखी बांधतो, त्याचप्रमाणे जी वास्तू आपल्याला ऊन, वारा, पावसापासून ...
Raksha Bandhan 2022: रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक आहे. यंदा ११ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. भाऊदेखील आपल्या बहिणींना भ ...
Shavan 2022: गणपती मंदिर, दत्त मंदिर, भवानी मंदिर, हनुमान मंदिर, शनी मंदिर इ. देवतांच्या मंदिरात संबंधित देवांच्या मूर्ती आढळतात. मात्र शिव मंदिरात पूजा होते, ती शिवलिंगाची! त्यालाही अपवाद आहे उत्तराखंड येथील एका शिवमंदिराचा! या मंदिरात शिवलिंगाऐवजी ...