Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
Raksha Bandhan Special Narali Bhat Recipe: नारळीपौर्णिमा किंवा रक्षाबंधनानिमित्त लाडक्या भावासाठी नारळीभात करायचा असेल तर ही रेसिपी बघा... सोप्या पद्धतीने अगदी परफेक्ट चवीचा नारळीभात करता येईल. ...