Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
गेले दोन आठवडे संततधार पावसाने झेंडू, गुलाब, निशिगंध यासह इतर फुलांवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने फुल उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. श्रावणात फुलांना मागणी वाढणार आहे. उत्पादन घटल्याने मिरजेतील फुलांच्या बाजारात आवक घटली आहे. मात्र, अद्याप मागणी ...
श्रावण महिन्यात उपवासाचे पदार्थ तयार करण्यासाठी आणलेल्या पदार्थावर किंवा तयार खाद्य पदार्थावर 'बेस्ट बिफोर'ची मुदत पाहिल्यानंतरच ते पदार्थ खरेदी करा, असा सल्ला अन्न व औषध प्रशासन विभागाकडून देण्यात येत आहे. ...