शिवेंद्रराजे भोसले Shivendra Singh Raje Bhosale हे भाजपाचे आमदार आहेत. अजिंक्यतारा सहकारी बॅंकेचे ते अध्यक्ष झाले आणि येथून त्यांच्या राजकीय प्रवास सुरू झाला. अभयसिंहराजे भोसले यांच्या निधनानंतर ते राजकारणात सक्रियपणे सहभागी झाले. त्यानंतर 2004 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर 2004 पासून सलग तीन वेळा साताऱ्यातून आमदारपदी निवडून आले. त्यानंतर 2019 मध्ये विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकत त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपात प्रवेश केला. त्यानंतर भाजपाच्या तिकिटावर ते सातारा मतदारसंघातून निवडून आले. Read More
सातारा येथील जुना मोटर स्टँड परिसरात पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्याचे काम सुरू होते. त्यातून झालेल्या वादावादीत खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या एन्ट्रीने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. ...
‘निवडणूक आली की शरद पवारांना जवळ करायचं. भाजपाच्या मंत्र्यांना भेटायचं, असं लक्षण हे स्वार्थीपणाचं असतं. म्हणूनच खासदार उदयनराजे हे जिल्ह्यातील सर्वात स्वार्थी नेते आहेत,’ असा पलटवार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला. ...
सातारा पालिकेतील सत्ताधारी शहर सफाईच्या ठेक्यातून जनतेच्या पैशांची नासाडी करत आहेत. शहर स्वच्छतेच्या नावाखाली साताऱ्यात पालिकेची तिजोरी साफ करण्याचा उद्योग सातारा विकास आघाडीच्या सत्ताधाऱ्यांनी सुरू केला आहे, असा गंभीर आरोप नगरविकास आघाडीचे अध्यक्ष आ ...
सातारा : छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे भारत देशाचे आराध्यदैवत. महाराष्ट्राची आणि प्रत्येक मराठी मनाची अस्मिता असलेल्या शिवछत्रपतींचा पुतळा गोवा राज्यातील साखळी या नगरपालिकेकडून हटवण्यात आला. ही खेद आणि चिंतेची बाब आहे. गोवा सरकारने साखळी येथील शिवाजी ...