करवीरनिवासिनी अंबाबाईचे मंदिर, पन्हाळगड, रंकाळा तलाव पाहून देशभरातून आलेले राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) शिबिरार्थी भारावून गेले. शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय एकात्मता शिबिर सुरू आहे. ...
मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ हे ज्ञानमंडळांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विद्वतजणांना एकत्र करून नवी ज्ञानसंस्कृतीची निर्मिती करीत आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांनी येथे केले. ...
जीवन सुखकर करण्यासाठी आपण जे संशोधन करीत आलो आहोत; त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत चालल्याचे चित्र आज निर्माण झाले आहे. असेच होत राहिले, तर मानवाचे अस्तित्व धोक्यात आल्याखेरीज राहणार नाही; त्यामुळे संशोधकांनीच आता ती जबाबदारी उचलून पर्यावरणपूरक संशोधन ...
शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर सुरू असलेल्या भारतीय सैन्यदलातील भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ४९०० जणांनी धावण्याची चाचणी दिली. त्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी आणि वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया दिवसभर सुरू राहिली. ...
संत साहित्याचे अभ्यासक आणि शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागाचे माजी प्रमुख प्रा. ल. रा. तथा लक्ष्मण रामदास नसिराबादकर यांचे मंगळवारी सकाळी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांचे वय ८४ होते. त्यांच्या पश्चात पत्नी मंदाकिनी, मुलगा सुनिल, मुलगी सुनिता, सूना, ...
शिवाजी विद्यापीठातील सभा, विशेष कक्ष, प्रश्नपत्रिका वितरण, परीक्षा देयके, आरोग्य केंद्र, नॅनो सायन्स टेक्नॉलॉजी विभाग प्रशासकीय गुणवत्ता अभियान आणि गुणवत्ता पुरस्कार योजनेमध्ये अव्वल ठरले. ...
आंतरजातीय, धर्मिय विवाहाबाबत नवीन कायदा व्हावा. प्रतिष्ठेपायी होणाऱ्या हिंसा रोखण्यासाठी नवा कायदा करण्यात यावा. वंचित भटक्या समाजाला आरोग्य सेवा मिळाव्यात, अशा विविध मागण्या शुक्रवारी राज्य महिला आरोग्य हक्क परिषदेत करण्यात आल्या. महिलांच्या आरोग्य, ...
शिवाजी विद्यापीठाच्या वर्धापनदिनी विविध पुरस्कारांचे वितरण केले जाते. त्यातील गुणवंत शिक्षक, प्रशासकीय सेवकांच्या पुरस्काराची रक्कम विद्यापीठाने वाढविली आहे. त्याची अंमलबजावणी यावर्षीपासून होणार आहे. विद्यापीठाचा ५६ वा वर्धापनदिन रविवारी (दि. १८) सका ...