मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या सन्मानार्थ त्यांचं स्मारक मुंबईतल्या अरबी समुद्रात बनवले जाणारे आहे. हे स्मारक मुंबई शहरातील गिरगाव चौपाटीजवळच्या परिसरातील अरबी समुद्रात असेल. स्मारकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची एकूण उंची 153 मीटर असणार आहे. या स्मारकामध्ये मंदिर, संग्रहालय, रुग्णालय, रायगड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती आणि शिवाजी महाराजांचे जीवनपट उलगडण्यासाठी थिएटर असेल. Read More
नौदलाचे निवृत्त व्हाईस अॅडमिरल आय. सी. राव, ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी द. म. सुकथनकर, वनशक्ति ट्रस्ट आणि आदिवासी कोळी समाज समन्वय समिती यांच्याकडून ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ...
२४ ऑक्टोबर २०१८ रोजी शिवस्मारक प्रकल्पाचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली या प्रकल्पाचे भूमिपूजन करताना बोट उलटल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. ...