श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे. Read More
नागरिक व कामगारांच्या प्रश्नी अनेकदा पत्र पाठवूनही साई संस्थानच्या तदर्थ समितीचे अध्यक्ष वेळ देत नाहीत. त्यामुळे त्यांची भेट मिळविण्यासाठी हजारो कामगार व ग्रामस्थांना घेवून ते बसत असलेल्या नगरच्या जिल्हा न्यायालयाच्या आवारात धरणे धरणार असल्याचा इशारा ...
साईमंदिरासह राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी शनिवारी (२९ आॅगस्ट) टाळ, मृदुंगाच्या गजरात साईदरबारी घंटानाद करण्यात आला. याप्रकरणी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाच आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
साईमंदिरासह राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी शनिवारी (२९ आॅगस्ट) टाळ, मृदुंगाच्या गजरात साईदरबारी घंटानाद करण्यात आला. यानंतरही मुक्या, बहि-या सरकारला जाग आली नाहीतर टाळ, मृदुंग वाजवत वर्षा बंगल्यावर जावू, असा इशारा माजीमंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांनी ...
जनमताच्या विरोधात जावून बनलेल्या महाविकास आघाडी सरकारला तीन चाके आहेत. यातील चाकांची हवा कमी झाल्यानंतर ते भरण्याचे ठिकाण नेमकं मुंबई, बारामतीला की संगमनेरला आहे? हा खरा प्रश्न आहे, अशी टीका खासदार सुजय विखे राज्य सरकारवर केली. ...
केंद्र सरकारने मंदिरे उघडण्यासाठी धोरण ठरवून आधीच परवानगी दिली आहे. मात्र, राज्य सरकार त्यावर निर्णय का घेत नाही? असा सवाल डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला आहे. ...
आर्थिक नियोजनाबरोबरच आयकर, इतर कर, केंद्रीय कायदे, निर्माण होणारे न्यायालयीन वादविवाद टाळण्यासाठी तिरूपतीच्या धर्तीवर साईसंस्थान अंतर्गत उद्दिष्टानुसार विविध ट्रस्ट निर्माण करण्याच्या विचारात आहे. ...
शिर्डी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांची बदली रद्द करावी. त्यांना किमान वर्षभर मुदतवाढ द्यावी, या मागणीसाठी बुधवारी (१२ आॅगस्ट) दुपारी शिर्डीत नागरिकांनी धरणे आंदोलन केले. बदली रद्द न झाल्यास तिव्र आंदोलनाचा इशारा यावेळी दिला. ...
साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी राज्य शासनाने सोमवारी (१० आॅगस्ट) के. एच. बगाटे यांची नियुक्ती केली आहे. साईसंस्थानचे चौथे सीईओ म्हणून बगाटे हे मंगळवारी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर पदभार स्वीकारणार आहेत. ...