India vs Australia : भारतीय संघानं ट्वेंटी-20 मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात टीम इंडियानं ६ विकेट्स राखून सहज विजय मिळवला. ...
सलग १० ट्वेंटी-२० सामन्यांत टीम इंडिया अपराजित राहिली आहे. या कामगिरीसह टीम इंडियानं सलग ९ ट्वेंटी-२० सामने जिंकण्याचा पाकिस्तानचा विक्रम मोडला. पाकिस्तानने जुलै २०१८ ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत सलग ९ ट्वेंटी-२० सामने जिंकले होते. ...
राहुल २२ चेंडूंत २ चौकार व १ षटकार मारून ३० धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर धवननं फटकेबाजी करताना ३४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. पण, अॅडम झम्पानं ३६ चेंडूंत ४ चौकार व २ षटकार मारून ५२ धावा करणाऱ्या धवनला माघारी पाठवून टीम इंडियाला मोठा धक्का दिला. ...
प्रत्युत्तरात लोकेश राहुल आणि शिखर धवन यांनी टीम इंडियाला सॉलिड सुरुवात करून दिली. राहुल व धवन यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली, परंतु सहाव्या षटकात अँड्य्रू टायनं भारताला धक्का दिला. ...