Ind vs Eng 1st T20 : इंग्लंडनं नाणेफेक जिंकली, टीम इंडियानं रोहित शर्माला विश्रांती दिली, जाणून घ्या Playing XI 

Ind vs Eng 1st T20 Live : England won the toss, Rohit Sharma Rested सलामीला रोहित शर्मा ( Rohit Sharma) सोबत कोणाला संधी देतो, याची उत्सुकता होती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 06:39 PM2021-03-12T18:39:27+5:302021-03-12T18:47:25+5:30

whatsapp join usJoin us
Ind vs Eng 1st T20 Live : England won the toss, Rohit Sharma Rested For Few Games, know both team Playing XI | Ind vs Eng 1st T20 : इंग्लंडनं नाणेफेक जिंकली, टीम इंडियानं रोहित शर्माला विश्रांती दिली, जाणून घ्या Playing XI 

Ind vs Eng 1st T20 : इंग्लंडनं नाणेफेक जिंकली, टीम इंडियानं रोहित शर्माला विश्रांती दिली, जाणून घ्या Playing XI 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ind Vs Eng T20 Live Update Score :  कसोटी मालिकेतील यशानंतर भारतीय संघ ट्वेंटी-20 मालिकेतही इंग्लंडला आपला दम दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. कसोटी मालिकेत उतरलेला भारतीय संघ आणि ट्वेंटी-20 मालिकेतील संघ यांच्यात बराच बदल असल्यानं या संघाचा सामना करायचा तरी कसा, हा प्रश्न इंग्लंडच्या संघाला पडला आहे. पण, आजच्या सामन्यात अंतिम ११ खेळाडू निवडताना कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याचाही कस लागणार आहे. इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया प्रथम फलंदाजीला मैदानावर उतरेल. ( England won the toss )

सलामीला रोहित शर्मा ( Rohit Sharma) सोबत कोणाला संधी देतो, याची उत्सुकता होती. शिखर धवन आणि लोकेश राहुल यांच्यापैकी कोण एक खेळणार याची उत्सुकता असताना विराट कोहलीनंरोहित शर्माला ( Rohit Sharma) विश्रांती देत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे धवन व लोकेश सलामीला खेळणार आहे.  Ind Vs Eng 1st T20 Live Score

सूर्यकुमार यादव, इशान किशन यांना पदार्पणासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार. चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर फलंदाजी करणार असून रिषभ पंत, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल व वॉशिंग्टन सुंदर अशी फलंदाजांची फौज टीम इंडियाकडे आहे. १५ महिन्यांनंतर भुवनेश्वर कुमार ( Bhuvaneshwar Kumar) पुनरागमन करत आहे. Ind vs Eng 1st T20 Live Match Today भारतीय संघ तीन फिरकीपटूंसह या सामन्यात मैदानावर उतरला आहे.


भारत : विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, वॉशिंग्टर सुंदर, शार्दुल ठाकूर, 

इंग्लंड : जेसन रॉय, इयॉन मॉर्गन (कर्णधार), जोस बटलर, डेवीड मलान, बेन स्टोक्स, सॅम कुरन, जोफ्रा आर्चर, ख्रिस जॉर्डन, आदील रशीद, मार्क वूड  

Web Title: Ind vs Eng 1st T20 Live : England won the toss, Rohit Sharma Rested For Few Games, know both team Playing XI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.