संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे. Read More
IPL 2026: इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) २०२६च्या सत्रासाठी दोन मोठ्या फ्रँचायझी चेन्नई आणि राजस्थान यांच्यात रवींद्र जडेजा आणि संजू सॅमसन यांच्या अदलाबदलीची चर्चा सुरू आहे. परंतु, डेवाल्ड ब्रेव्हिसमुळे या करारामध्ये एक मोठा अडथळा निर्माण झाला आहे. ...