हिवरगाव पावसा येथील टोलनाका शिवसैनिकांनी सोमवारी फोडला. एम. एच. १७ या पासिंगच्या चारचाकी वाहनांना टोलमुक्ती द्यावी, यासाठी शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह शिवसैनिकांनी ही टोलफोड केली. ...
जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पावसाने तडाखा दिला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वा-यामुळे अनेक शाळांचे पत्रे उडून गेले. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही. ...
निळवंडे धरणातील एक थेंबसुद्धा पाणी लाभक्षेत्राबाहेर जाऊ दिले जाणार नाही. त्यामुळे या पाण्यावर कोणी हक्क सांगू नये, असा इशारा आमदार बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी दिला. तळेगाव दिघे ( ता.संगमनेर) येथील चौफुलीवर निळवंडे पाटपाणी संघर्ष समितीच्या वतीने आय ...
कत्तलखान्यावर शहर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ५ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही घटना शनिवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास भारतनगर परिसरातील जमजम कॉलनी (गल्ली क्रमांक नऊ) येथे घडली. घटनास्थळावरून पोलिसांनी तीन वाहनांसह एक हजार किलो ...
संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील जिल्हा बँकेच्या शाखेशेजारी असलेल्या इंडिया एटीएम कंपनीच्या केंद्रातील एटीएम मशिन गुरूवारी पहाटे चोरट्यांनी फोडले. वाहनात टाकून हे मशिन घेऊन जाण्याचा चोरट्यांचा प्रयत्न होता. पण ते जड असल्याने केंद्राबाहेरच ते फेकून ...
संगमनेर तालुक्यातील चिंचपूर दुर्गापूर येथील एका शेतक-यावर बिबट्यानं हल्ला केला. या हल्ल्यात सुनिल सखाराम गवारे जखमी झाले आहे. बिबट्यानं सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला. ...