१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. Read More
Sachin Vaze - रिपाइं नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी ठाकरे सरकारवर टीका करत राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) करत असलेल्या तपासानंतर या प्रकरणातील सत्य समोर येईल, असे म्हटले आहे. ...
Shiv Sena leader Anil Parab's reply to Nitesh Rane : नितेश राणे यांनी जे आरोप केले आहेत, ते सिद्ध करण्याची जबाबदारी ही आता सर्वस्वी त्यांचीच असेल. (Sachin Vaze Case) ...
Varun Sardesai Warning to BJP Nitesh Rane: गेल्या ६ महिन्यापासून राणे कुटुंबाच्या पत्रकार परिषदा पाहिल्या तर त्यांना कोणी गांभीर्याने घेत नाही, परंतु आज त्यांनी माझ्यावर वैयक्तिक जे आरोप केलेत, ते खोटे आहेत, त्यात काहीही तथ्य नाहीत ...