ठाकरे सरकारने सचिन वाझेला पाठिशी घातले, NIA मुळे सत्य समोर येईल: रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 08:02 PM2021-03-15T20:02:38+5:302021-03-15T20:04:45+5:30

Sachin Vaze - रिपाइं नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी ठाकरे सरकारवर टीका करत राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) करत असलेल्या तपासानंतर या प्रकरणातील सत्य समोर येईल, असे म्हटले आहे.

ramdas athawale slams thackeray govt on sachin vaze case | ठाकरे सरकारने सचिन वाझेला पाठिशी घातले, NIA मुळे सत्य समोर येईल: रामदास आठवले

ठाकरे सरकारने सचिन वाझेला पाठिशी घातले, NIA मुळे सत्य समोर येईल: रामदास आठवले

googlenewsNext
ठळक मुद्देरामदास आठवले यांची राज्य सरकारवर टीकासचिन वाझे यांची भूमिका संशयास्पद - रामदास आठवलेNIA मुळे सत्य समोर येईल - रामदास आठवले

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी, गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू (Mansukh Hiren Death Case) आणि त्यानंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना झालेली अटक या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर आता राजकारण आणखी तापू लागले आहे. भाजपने यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली आहे. यावर आता रिपाइं नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी ठाकरे सरकारवर टीका करत राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) करत असलेल्या तपासानंतर या प्रकरणातील सत्य समोर येईल, असे म्हटले आहे. (ramdas athawale slams thackeray govt on sachin vaze case)

सचिन वाझे प्रकरणात राज्य सरकारची भूमिका चुकीची आहे. या प्रकरणातील सत्य लवकरच सर्वांसमोर येईल. राज्य सरकार सचिन वाझे यांना पाठिशी घालत आहे, असा आरोप रामदास आठवले यांनी यावेळी केला. या प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सचिन वाझेला अटक करण्याची मागणी सुरुवातीपासून केली होती. असे अधिकारी मुंबई पोलिसांच्या चांगल्या प्रतिमेला बाधा ठरतात, असे रामदास आठवले म्हणाले. 

सीमाप्रश्नी महाराष्ट्रातील लोकं विनाकारण हस्तक्षेप का करत आहेत? कुमारस्वामींचा थेट सवाल

इनोव्हा गाडीबाबत एनआयए तपासात माहिती उघड

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांची गाडी आढळल्या प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने केलेल्या तपासात गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केली. या प्रकरणात असणारी स्कॉर्पियो गाडीच्या मागे असणारी इनोव्हा गाडी ही क्राईम ब्रांचचे अधिकारी सचिन वाझेची असल्याचे एनआयएच्या तपासात उघड झाले. या प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने अत्यंत योग्य कारवाई केली आहे, असे रामदास आठवले यांनी सांगितले.

सचिन वाझे यांची भूमिका संशयास्पद

या प्रकरणात सचिन वाझे यांची भूमिका संशयास्पद आहे. त्यांना अटक करा अशी मागणी विरोधी पक्ष करीत होता. मात्र, महाराष्ट्र पोलिसांनी सचिन वाझेला अटक केली नाही. पोलिसांवर राज्य सरकारचा दबाव होता. एनआयएने केलेली कारवाई अत्यंत योग्य आणि जनतेचा कायद्यावरील विश्वास वाढविणारी कारवाई ठरली आहे, असे रामदास आठवले म्हणाले. 

दरम्यान, सचिन वाझे यांच्यावरील कारवाईच्या विरोधात त्यांचे  भाऊ सुधर्म वाझे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सचिन वाझे यांना उच्च न्यायालयात हजर करण्यासाठी त्यांनी हेबियस कॉर्पस दाखल केली आहे. त्यांना एनआयएने बेकायदेशीररीत्या अटक केली आहे, असा आरोप सुधर्म यांनी याचिकेत केला आहे. सुधर्म यांनी उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस दाखल करून वाझे यांच्या अटकेवर हरकत घेतली आहे. वाझे यांना न्यायालयात हजर करण्यात यावे आणि त्यांची सुटका करण्यात यावी, अशी  मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. 

Web Title: ramdas athawale slams thackeray govt on sachin vaze case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.