१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. Read More
mansukh hiren death case : स्फोटक गाडीच्या गुन्ह्याचा तपास करताना सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्याकडून ‘एनआयए’च्या पथकाने एक मर्सिडीज जप्त केली आहे. मात्र, या गाडीसोबत भाजप (BJP Leader) नेत्याचे संबंध असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत ...
Antilia bomb scare, Sachin Vaze Case: सीसीटीव्ही फुटेज गायब करणे, घटनास्थळावरील पुरावे नष्ट करणे, मनसुख हिरेनचा मृतदेह सापडणे, वाझेंचे त्याचाशी असलेले संबंध उघड होणे आदी समोर आल्याने अखेर सचिन वाझेंना अटक झाली. यानंतर खरी चर्चा सुरु झाली ती वाझेंनी अ ...
Sachin Vaze Case: अंबानींच्या घरासमोर ठेवलेल्या स्फोटकांच्या कटाची सूत्रे एका आयपीएस अधिकाऱ्याने हलविल्याचा आरोप भाजपा नेते किरिट सोमय्या यांनी केला आहे. दरम्यान, सचिन वाझे वापरत असलेली मर्सिडीज कार एनआयएने ताब्यात घेतली. यामधून बॅग, डायरी, शर्ट आणि ...
मुंबई क्राइम ब्रँचच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोमवारी रात्रीपासून मंगळवारी पहाटे चार वाजेपर्यंत आठ तास ही कारवाई सुरू होती. स्फाेटकांनी भरलेली स्काॅर्पिओ वाझेनीच पार्क केल्याचे एनआयएच्या तपासातून समोर आले आहे. ...
गाडी पार्क करणे, इनोव्हाची नंबर प्लेट बदलणे, ठाण्यातील वाझे यांचे निवासस्थान व नंबरप्लेट बनविलेल्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज गायब करणे, याबद्दल त्यांच्याकडे चाैकशी करण्यात येत आहे. ...
येत्या दोन - तीन दिवसांत एनआयएकडून या गुन्ह्याबाबत तपासाअंती मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मुंबई पोलीस दलात फेरबदल करण्यात येतील, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. ...