१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. Read More
Congress MP Kumar Ketkar raised issue of Mukesh Ambani Bomb Scare in Rajyasabha: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटिन स्फोटकांनी भरलेली गाडी आढळली होती, त्या गाडी मालकाचा मृतदेह सापडला. या प्रकरणाचा तपास NIA करत आहे. ...
Mukesh Ambani Bomb Scare, Devendra Fadnavis meet PM Narendra Modi, Amit Shah: या प्रकरणावर फडणवीसांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. सचिन वाझे यांना पोलीस दलात परत घेण्यासाठी २०१८ मध्ये खुद्द आत्ताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फोन करून दबाव आणला होता असा ...
Ravi Rana And Thackeray Government Over Sachin Vaze : आमदार रवी राणा यांनी सचिन वाझेंचाही हिरेन होईल, त्यांना तातडीने संरक्षण द्या अशी मागणी केली आहे. ...
Mukesh Ambani Antilia Bomb Scare: एनआयएला या व्यक्तीचा सुगावा लागल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली करण्याची पटकथा लिहिली गेल्याचे मानले जात आहे. ...