'मिर्झापूर असो किंवा महाराष्ट्र, राजकारणात प्यादीच मरतात'; मनसेकडून व्हिडिओ शेअर

By मुकेश चव्हाण | Published: March 18, 2021 09:25 AM2021-03-18T09:25:37+5:302021-03-18T09:25:46+5:30

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

MNS leader Sandeep Deshpande has shared a video on Facebook. | 'मिर्झापूर असो किंवा महाराष्ट्र, राजकारणात प्यादीच मरतात'; मनसेकडून व्हिडिओ शेअर

'मिर्झापूर असो किंवा महाराष्ट्र, राजकारणात प्यादीच मरतात'; मनसेकडून व्हिडिओ शेअर

Next

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळली होती, या प्रकरणाचा तपास NIA करत आहेत, यात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे, यावेळी चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

सचिन वाझेंचं नाव या प्रकरणात समोर आल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. स्कोर्पिओ मालक मनसुख हिरेन यांचा मृत्यू(Mansukh Hiren Death) आणि सचिन वाझे यांना अटक(Sachin Vaze Arrested by NIA) या प्रकरणाचे एकमेकांशी धागेदोरे जोडलेले आहेत. सचिन वाझे प्रकरणात खुद्द विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ठाकरे सरकारविरोधात गंभीर आरोप केले आहेत. भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी देखील नैतिक जबाबदारी स्विकारुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. याचदरम्यान मनसेने देखील अप्रत्यक्षरित्या ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. 

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओद्वारे मिर्झापूर असो किंवा महाराष्ट्र, राजकारणात प्यादीच मरतात, असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला आहे. याआधी देखील महाराष्ट्राला लागून असलेली राज्य गोवा, गुजरात कर्नाटक मध्य प्रदेश आंध्र प्रदेश इथे कोरोना वाढत नाही. कोरोनाच महाराष्ट्रावर प्रेम आहे की महाराष्ट्र सरकारच कोरोना वर प्रेम आहे? की स्वतःच अपयश झाकण्यासाठी टाळे बंदी आणि कोरोनाचा वापर होतो आहे, असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला होता. 

तत्पूर्वी, एनआयएने ठाण्यातील साकेत सोसायटीत राहणारे वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या निवासस्थानाची बुधवारी झडती घेतली. त्यांच्या पत्नी मोहिनी वाझे यांच्याकडे चार ते पाच तास चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. वाझेंच्या मर्सिडीज बेन्झमध्ये सापडलेली पाच लाखांपेक्षा अधिक रोकड, इतर सामग्रीबाबत त्यांनी योग्य उत्तरे दिली नाहीत. 

एनआयएचे विशेष पोलीस महानिरीक्षक अनिल शुक्ला यांच्या पथकाने बुधवारी दुपारी १.३०च्या सुमारास ठाण्यातील साकेत येथील बी-६ इमारतीमधील वाझेंच्या घरात झडती घेतली. मनसुख हिरेन आणि वाझे यांचे कसे संबंध होते? मनसुख यांच्या हत्येपूर्वी ते साकेत सोसायटीत आले होते का? वाझेंबरोबर काही वाद झाला होता का? अशा अनेक बाजूंनी वाझेंच्या कुटुंबीयांकडे अधिकाऱ्यांनी चौकशी केल्याचे समजते. चार तासांची घरझडती,  कागदपत्रे पडताळणी, चौकशीनंतर तेथे राबोडी पोलिसांना बोलावले. सोसायटीतील काही रहिवाशांकडेही चौकशी केली. 

परमबीर सिंग यांना हटविले, नगराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

राज्य सरकारने पोलीस दलात बुधवारी मोठे फेरबदल केले. परमबीर सिंग (Parambir Singh) यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करत होमगार्डचे महासंचालक म्हणून बदली केली. तर राज्याचे प्रभारी पोलीस महासंचालक हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांची मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी सायंकाळी त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. 

CCTV मध्ये दिसणारी ‘ती’ व्यक्ती सचिन वाझेच

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जे सीसीटीव्ही फुटेज सापडलं होतं, त्यात एक व्यक्ती संशयास्पदरित्या पीपीई किट्स घालून जात असल्याचं दिसत होतं, परंतु NIA च्या तपासात ही व्यक्ती पीपीई किट्स नव्हे तर पांढऱ्या रंगाचा मोठा कुर्ता आणि डोक्यावर रुमाल घेतल्याचं समोर आलं आणि ही व्यक्ती दुसरं तिसरं कोणी नसून सचिन वाझेच असल्याचा खुलासा NIA ने केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळचं वळण लागलं आहे. NIA ने म्हटलंय की, CCTV फुटेजमध्ये सचिन वाझे मोठ्या रुमालाने स्वत:चं डोकं लपवत जाताना दिसतात, कारण त्यांना कोणी ओळखू नये, त्याचसोबत बॉडी लॅग्वेंज आणि चेहरा लपवण्यासाठी त्यांनी मोठ्या आकाराचा कुर्ता-पायजमा घातला होता.

'ती इनोव्हा गाडी मीच चालवत होतो'

दरम्यान, एनआयएच्या (NIA) पथकाने एक इनोव्हा गाडी जप्त केली आहे. ती इनोव्हा गाडी आपणच चालवत होतो, अशी कबुली याप्रकरणातील आरोपी सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी दिली आहे. गेल्या महिन्यात २५ फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडली होती. त्यानंतर घटनास्थळावर आणखी एक इनोव्हा गाडी आढळून आली होती. ही पांढऱ्या रंगाची इनोव्हा गाडी सचिन वाझे हेच चालवत होते, अशी माहिती एनआयएच्या सूत्रांकडून मिळाली आहे. 

Web Title: MNS leader Sandeep Deshpande has shared a video on Facebook.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app