माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. Read More
Anil Deshmukh News : सचिन वाझे प्रकरणात मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली झाल्यानंतर आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचाही राजीनामा घेण्यात येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ...
amruta fadnavis tweet on sachin vaze case : राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही आता वाझे प्रकरणात उडी घेतली आहे. ...
Sachin Vaze Case :एनआयएकडून सचिन वाझेंच्या सुरू असलेल्या चौकशीत दररोज नवनवे गौप्यस्फोट होत आहेत. दरम्यान, सचिन वाझेंनी या प्रकरणात केलेल्या काही चुका त्यांना भोवल्या आहेत. त्यांचा घेतलेला हा आढावा. ...
BJP Leader Ram Kadam criticized NCP : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना अधिकारी आणून आपल्याच सरकारमधील मंत्र्यांवर पाळत ठेवण्याचे उद्योग केले होते, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता. ...