१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. Read More
Mukesh Ambani Bomb Scare, Mansukh Hiren Murder: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याकांड यातील प्रमुख आरोपी सचिन वाझे याचे बाईक रायडिंगचे अनेक फोटो आणि व्हिडीओ प्रसिद्ध झाले आहेत. ...
Crime Recreation of Sachin Vaze in Mansukh Hiren Murder Case: मनसुख हिरेन हत्याकांडाचा तपास करताना NIA टीमनं सचिन वाझेला घेऊन रेल्वे स्टेशनवर क्राईम रिक्रिएशन केले आहे. ...
A team of CBI officers will arrive in Mumbai: हायकोर्टाच्या(Mumbai High Court) आदेशानुसार या आरोपांची १५ दिवसांत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला देण्यात आले. ...
Anil Deshmukh possible to go in Supreme court against high court CBI enquiry order: अनिल देशमुख दिल्लीला गेले तरी ते कोणाला भेटणार याची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार सध्या आजारपणामुळे मुंबईत आहेत. ...