१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. Read More
बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेची चांदीवाल आयोगासमोर चौकशी सुरु आहे. आता या चौकशीत वाझे दररोज नवनवीन प्रताप करतोय. म्हणजे एकीकडे वाझे चौकशीत गंभीर आरोप करतोय, दुसरीकडे चौकशीला येणाऱ्या अनेकांना भेटायचा प्रयत्न करतोय. सोमवारी वाझे परमबीर सिंह यांना गुप ...
Parambir Singh And Sachin Vaze : नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग म्हणाले की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि त्यांचे माजी सहकारी आणि बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्यातील कथित भेटीबाबत आमच्याकडे कोणतीही माहिती नाही. ...
Parambir Singh and Sachin Vaze: चांदीवाल समितीसमोर चौकशीला जाण्यापूर्वी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि सचिन वाझे हे एकमेकांना भेटल्याचे वृत्त समोर आले आहे. हे नियमाला धरून नाही. ते दोघे का भेटले, कशासाठी भेटले, याची उच्चस्तरीय चौकशी झाली प ...
पालांडे यांचे वकील नितीन जगताप यांच्याकडून वाझेची उलट तपासणी करण्यात आली. यावेळी वाझेने, अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरून पुन्हा सेवेत रुजू झाले असल्याचे सांगितले. मात्र विनंती पत्राशिवाय दुसरा कोणताही पुरावा आपल्याकडे नसल्याचे सांगितले. ...
Anil Deshmukh : दरदिवशी ८-९ तास चौकशी करून देशमुखांचा ईडी कोठडीत छळ सुरू आहे. त्यांना मानसिकरित्या त्रास दिला जात आहे, असा युक्तिवाद अनिल देशमुखांच्यावतीने ज्येष्ठ वकील विक्रम चौधरी यांनी केला. ...