१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. Read More
हप्ता वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी सचिन वाझेने तक्रारदार बिमल अग्रवालला अनेक आमिषे दाखविली. त्यापैकी प्रसाद लाड विरुद्ध दाखल प्रलंबित गुन्ह्याचे काम पूर्णत्वाला न्यायचे होते. मात्र, वाझेने त्यातून नंतर हात झटकून घेतल्याचे तक्रारदाराने जबाबात म्हट ...
Parambir Singh: ११.९२ लाखाच्या खंडणी वसुलीबद्दल या दोघांसह ६ जणांविरुद्ध पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीमध्ये त्याने अनेक धक्कादायक बाबींचा उलगडा केला आहे. वाझेने एनआयए कोठडीतून न्यायालयाला लिहिलेले पत्रातील माहिती चुकीची असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. ...
Parambir Singh: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात आता आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात एका व्यापाऱ्यानं वसूलीसंदर्भात तक्रार दाखल केली आहे. शुक्रवारी रात्री या गुन्ह्याची नोंद झाली आहे. ...
Sachin Waze Anil Deshmukh : सचिन वाझे आणि अनिल देशमुख प्रकरणात न्यायमूर्ती चांदिवाल यांच्या समितीसमोर अनेक गोष्टी समोर. वाझेने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात देशमुख यांच्याशी एकदाच भेटल्याची कबुली दिल्याचा देशमुख यांच्या वकिलाचा दावा. ...
Sachin Waze Anil Deshmukh : नंबर वन म्हणजे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग नसून गृहमंत्री अनिल देशमुख यांना उद्देशून म्हटल्याचा जबाब त्याने दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. ...