म्यानमारमध्ये कोणत्याही प्रकारचे धार्मिक भेदभाव होत नसल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी पोप फ्रान्सिस यांना दिली. पोप गेले दोन दिवस म्यानमारच्या भेटीवर आहेत. ...
राखिन प्रांतामध्ये रोहिंग्या परत यावेत यासाठी बांगलादेश आणि म्यानमारने आज करारावर स्वाक्षऱ्या केल्या. बांगलादेशातर्फे परराष्ट्र मंत्री ए.एच. मेहमूद अली आणि म्यानमारतर्फे स्टेट कौन्सिलर कार्यालायाचे राज्यमंत्री क्याऊ टिंट स्वे यांनी स्वाक्षऱ्या केल्या ...
म्यानमारमधील हिंसाचार आणि अशांततेला घाबरुन बांगलादेशात गेलेल्या रोहिंग्यांच्या प्रश्नावर या दोन्ही देशांनी चर्चा सुरु केली आहे. रोहिंग्या लवकरात लवकर राखिन प्रांतामध्ये परत जावेत यासाठी जगभरातील देश या चर्चेवर लक्ष ठेवून आहेत. ...
म्यानमारच्या राखिन प्रांतातून बांगलादेशात आलेल्या 6 लाख रोहिंग्यांच्या पुनर्वसनासाठी तीन टप्प्यांमध्ये आराखडा सुचवला आहे. राखिनमध्ये शस्त्रसंधी करणे सर्वात जास्त फायदेशीर ठरेल असे तीनने मत मांडले आहे ...
संयुक्त राष्ट्राने काल घेतलेल्या भूमिकेमुळे पळून गेलेल्या 6 लाख रोहिंग्यांबद्दल बांगलादेशाशी चालू असलेल्या चर्चेवर परिणाम होईल अशी सूचक प्रतिक्रिया म्यानमारतर्फे व्यक्त करण्यात आली आहे. ...
सुरक्षा परिषदेने एकमुखाने म्यानमारमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराचा निषेध केला. तसेच या हिंसात्मक वातावरणामध्ये होत असलेल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाचाही निषेध करण्यात आला. ...
म्यानमारच्या स्टेट कौन्सिलर आंग सान सू की यांनी उत्तर राखिन प्रांताचा दौरा सुरु केला आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपासून उफाळलेल्या असंतोष, जाऴपोळीच्या सत्रानंतर आंग सान सू की यांच्यावर चहूबाजूंनी टीका होत होती. ...