Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत. Read More
अयोध्येतील राम मंदिरात भगवान श्रीरामांच्या मिशी असलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात यावी, अशी मागणी शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केली आहे. एवढेच नाही, तर खरी प्रभू श्रीरामांची मूर्ती तर मिशीसहच असायला हवी, यावरही त्यांनी जोर द ...
राजीव गांधी यांच्यामुळेच राम मंदिराच्या निर्माणाचं स्वप्न साकार होत आहे. आज ते असायला हवे होते. राम मंदिराच्या निर्माणासाठी राज्यातील जनतेकडून ११ चांदीच्या विटा पाठवण्यात येणार असल्याची माहिती कमलनाथ यांनी दिली. ...
एकीकडे काँग्रेसचे नेते मंदिराच्या भूमिपूजनावरून सत्ताधारी भाजपावर टीका करत आहेत. तर दुसरीकडे आज काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी एक पत्रक प्रसिद्ध करून राम मंदिराला समर्थन दिले आहे. ...
नेवासा : श्री क्षेत्र देवगडचे प्रमुख महंत भास्करगिरी महाराज यांनी मंगळवारी अयोध्येला पोहचल्यानंतर न्यास कार्यशाळेत जाऊन मंदिरासाठी उभारण्यात येणाऱ्या शीलांची पहाणी केली. ...