शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत. Read More
Rajinikanth's 'Jailer 2' big update : सुपरस्टार रजनीकांत यांच्या सुपरहिट चित्रपट 'जेलर'च्या सीक्वलबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. त्यांच्या आगामी 'जेलर २' चित्रपटात आता एका बॉलिवूड अभिनेत्रीची एन्ट्री झाल्याचे सांगितले जात आहे. ...
Rajinikanth And Aishwarya Rai : रजनीकांत यांचा एक चित्रपट २५ वर्षांनंतर सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात रजनीकांत यांना ऐश्वर्या रायला कास्ट करायचे होते, पण तिने हा सिनेमा नाकारला. ...
'दशावतार' सिनेमात मुख्य भूमिकेसाठी दिलीप प्रभावळकर यांच्यासोबतच साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांच्या नावाचाही विचार झाल्याची चर्चा होती. यावर आता दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी भाष्य केलं आहे. ...