तातडीच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यासाठी ठोस निर्णय घेण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन त्वरीत बोलवावे असं त्यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात सांगितले आहे. ...
सीना नदीच्या पात्रात २२ ते २३ सप्टेंबर यादरम्यान दोन लाखांहून अधिकचा विसर्ग येत होता. त्यामुळे माळा, मोहोळ, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील नदीकाठच्या गावांना महापुराचा तडाखा बसला. ...
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी रविवारी जिल्ह्यातील पूरस्थिती आणि शासनाकडून सुरु असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. ...
मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत पूरपरिस्थीने दाणादाण उडविली. अतिवृष्टी आणि नाशिक जिल्हयांतील धरणांमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदी गोदावरीला महारौद्ररुप धारण केले आहे. खबरदारी म्हणून नदीकाठच्या गावांतील नागरिकांचे स्थलांतर सुरु आहे. ...
पावसाची दोन महिने वाट पाहणाऱ्या मराठवाड्यात गेल्या पंधरा दिवसांत सरासरीपेक्षा ६०% जास्त पाऊस झाल्याने पूरस्थिती ओढावली. त्यात भर म्हणजे मध्य महाराष्ट्रातही गेल्या आठवडाभरात पावसाचा कहर सुरू आहे. ...
बिचाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला भुर्दंड पाडून लाखोंचा खर्च कशाला करायचा? ते रडगाणं तर सामनातून चालूच असतं की असा खोचक टोलाही मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. ...