सिडको : लेखानगर ते राजीवनगर रोड येथे गेल्या अनेक दिवसांपासून दिशादर्शक कमान पडून असून, यामुळे महानगरपालिकेचा यासाठी केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेला आहे. महापालिकेने ही कमान त्वरित उभी करावी, अशी मागणी कैलास चुंभळे यांनी केली आहे. ...
येवला : गेल्या तीन दिवसात झालेल्या वादळी पावसाने तालुक्यातील २६ गावांमधील ३ हजार १०४ शेतकऱ्यांच्या २ हजार १८८.९० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती तहसिलदार रोहिदास वारूळे यांनी दिली. ...
मंगळवारी (दि. ८) रात्री पावसाने घातलेल्या तांडवामुळे वीजपुरवठा करणारी ३४० रोहित्रे बंद पडली. बंद झालेला वीजपुरवठा महावितरणने बुधवारी दुपारपर्यंत अथक प्रयत्नांनी पूर्ववत केला. जिल्ह्यातील नऊ हजार २०० ग्राहकांना खंडित विजेचा फटका सोसावा लागला. ...
मंगळवारची रात्र जिल्ह्यातील करवीर, कागल, पन्हाळा, राधानगरी या तालुक्यांसाठी वैऱ्याची ठरली. करवीरमध्ये तर आभाळच फाटले. अवघ्या दोन-तीन तासांत तब्बल ४८२ मिलिमीटर पाऊस पडला. ...
जरगनगर ते जोतिर्लिंग कॉलनी रस्त्यावर असलेल्या पुलाला मंगळवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे भगदाड पडले, तसेच पुलावरील अर्ध्याहून अधिक रस्ता उखडला. त्यामुळे हा रस्ता बुधवारपासून वाहतुकीस बंद ठेवण्यात आला. ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक स्वरुपात पाऊस होत असून कोयनेला ४ आणि महाबळेश्वरला ११ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणात १०३.३० टीएमसी पाणीसाठा झाला होता. ...