रायगड जिल्ह्यातील महत्त्वाच्या बाजारपेठा, कापड मार्केट, भाजी मंडई, मासळी बाजार बंद ठेवण्यात आला. रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकाराची नोंद झाली नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. ...
पुणे-नगर महामार्गावरील भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेचा कर्जत तालुक्यातील आंबेडकर अनुयायी संघटनांनी जाहीर निषेध केला आहे. या वेळी तीन तास कर्जत बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. ...
खरीप आणि रब्बी या दोन्ही कृषी हंगामाकरिता रायगड जिल्ह्यास २१५ कोटी ७६ लाख रुपयांच्या कृषी कर्जवाटपाच्या उद्दिष्टापैकी ३१ डिसेंबर २०१७ अखेर ७४ टक्के म्हणजे १६० कोटी ७३ लाख रुपयांचे कृषी कर्जवाटपाचे उद्दिष्ट साध्य केले आहे. ...
सरत्या वर्षाला निरोप देताना थर्टीफर्स्टचे सेलिब्रेशनही तेवढ्याच धूमधडक्यात व्हायला पाहिजे. याची किंचितही कसर न राहता स्थानिकांसह पर्यटकांनी हा आनंदी सोहळा अगदी जल्लोषात साजरा केला. या सेलिब्रेशनची धूम इतकी मंत्रमुग्ध करणारी होती की, नववर्षातील सूर्या ...
रायगड : जिल्ह्यातील तब्बल 4 हजार 340 गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवून गंडा घालून तब्बल एकूण पावणोपाच कोटींची फसवणूक केल्या प्रकरणी, ठाणे जिल्ह्यातील विरार येथील रहिवासी भुपेंद्र चंद्रकांत मालवणकर यास रायगड पोलीसांच्या आर्थि ...
रायगड जिल्ह्यात जादा पर्यटक येण्याची शक्यता लक्षात घेता, येत्या 29 ते 31 डिसेंबर (शुक्रवार ते रविवार) दरम्यान जिल्ह्यातील सर्व प्रमुख मार्गांवरील रहदारी सुरळीत ठेवून पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्या. ...
कर्जत : एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून आमदार सुरेश लाड यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. आजचा हा सत्कार समारंभ पाहिल्यावर लाड यांच्या राजकीय भवितव्याबाबत मला मुळीच चिंता वाटत नाही. ...