राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे. Read More
Virat Kohli Rahul Dravid: ७७ धावांची खेळी करणाऱ्या विराट कोहलीला सामनावीराचा किताब देण्यात आला. त्यानंतर त्याने भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ड्रेसिंग रूममध्ये काय करत असतो, याबद्दल भाष्य केले. ...
१९ नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या फायनलमध्ये भारताला ६ विकेट्सने हार मानावी लागली. भारताचे २४० धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने ट्रॅव्हिस हेडच्या शानदार शतकाच्या जोरावर ४३ षटकांच्या आत पार केले. ...