भारताच्या राही सरनोबतने 25 मी. पिस्तुल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत राहीने अखेर दमदार कामगिरी केली आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली. राहीचे हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक ठरले आहे. Read More
कोल्हापूरच्या मातीत जन्मलेल्या २७ वर्षीय राहीने अंतिम फेरीत दिलेली कडवी झुंज पाहताना काळीज वर खाली होत होते. पण सुवर्णपदकाच्या इतक्या जवळ येऊन माघारी परतणे हे राहीला मान्य नव्हते. अखेरपर्यंत ती लढली आणि विजयाने तिला मुजरा केला. ...