विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान साधारण १२ ते १४ डिग्री सें.ग्रेड च्या आसपास तर दुपारचे कमाल तापमान २६ ते २८ डिग्री सें.ग्रेड च्या आसपास जाणवेल. ही दोन्हीही तापमाने सरासरी तापमानापेक्षा एखाद्या डिग्री सें.ग्रेड खालावलेलीच आहेत. ...
गारपीट, अवकाळी पावसाच्या तडाख्यानंतर काही दिवसांची उसंत मिळाल्यानंतर आता ढगाळ वातावरण, धुक्याने शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त झाले आहेत. यामुळे वेळीच खबरदारी न घेतल्यास कांदा, गहू, हरभरा आदी पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. ...
कांद्याची निर्यातबंदी झाल्यामुळे कांद्याचे दर पडले आहेत. गेल्या पंधरा दिवसांमध्ये क्विंटलला तीन हजार सहाशे ते चार हजार पाचशे रुपये भाव होता. गेल्या आठवड्यापासून भाव कमालीचा घसरला आहे. आता ही निर्यातबंदी उठली नाही तर आम्हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मा ...
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात नुकताच बिगरमोसमी पाऊस पडून गेला आहे. पडलेल्या या पावसामुळे कोरडवाहू क्षेत्रातील जमिनीत बऱ्यापैकी ओलावा निर्माण झाला आहे. हा ओलावा कोरडवाहू रब्बी पिकांच्या दाणे भरण्याच्या अवस्थेपर्यंत टिकवून ठेवला ...
शेतकरी बांधवांनी जर पेरणी पध्दती नुसार योग्य वाणांचा, सुधारीत लागवड व खत व्यवस्थापन तंत्राचा अवलंब केला तर महाराष्ट्राची गहू उत्पादकता वाढविता येणे शक्य आहे. ...
कोथिंबीर हे कमी वेळात येणारे चांगला आर्थिक नफा देऊन जाणारे उत्तम पीक आहे. साधारणतः कोथिंबिरीला वर्षभर बाजारात चांगल्या प्रकारची मागणी असते, व्यवस्थित तंत्रज्ञानाचा वापर करून आणि व्यवस्थित नियोजन केले तर कोथिंबीरीचे पीक हमखास भरघोस नफा मिळवून जाते. ...
जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगाम मोठ्या प्रमाणात घेण्यात येतात. यासाठी खते, बियाणांची उपलब्धता करण्यात येते. त्यामुळे खते व बियाणांबाबत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून कृषी विभागाची भरारी पथके तयार असतात. या पथकांची नजर विक्रेत्यावर असते. ...