भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin 418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत. Read More
भारतीय संघाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडविरुद्ध ४-१ असा विजय मिळवला. धरमशाला कसोटीचा निकाल तिसऱ्याच दिवशी लागला. भारताच्या पहिल्या डावातील २५९ धावांचा पल्ला इंग्लंडला दुसऱ्या डावात ओलांडता आला नाही आणि भारताने एक डाव व ६४ धावांनी सामना जि ...
इंग्लंडच्या पहिल्या डावातील २१८ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने ४७७ धावा करून २५९ धावांची आघाडी घेतली. आर अश्विनने त्याच्या पहिल्या ४.२ षटकांत बेन डकेट, झॅक क्रॉली व ऑली पोप यांना माघारी पाठवले. ...
कसोटीत एकाच फलंदाजाला भारतीय गोलंदाजाने बाद केल्याची ही सर्वोत्तम आकडेवारी आहे. कपिल देव यांनी मुदस्सर नाझरला १२ वेळा बाद केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अश्विनने १७ वेळा स्टोक्सला बाद करून कपिल देव यांचा ( १६ वि. डेसमंड हायनेस) विक्रम मोडला. ...