जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला. Read More
नालासोपारा, पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये जवानांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईजवळील नालासोपारा येथे नागरिकांनी रेल रोको केला आहे. या रेलरोकोमुळे नालासोपारा ते ... ...
मुंबई - पुलवामा येथील सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना देशभरातून आदरांजली वाहण्यात येत आहे. बॉलीवूडमधील अभिनेते ... ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घडीला विरोधकांवरील हल्ले थांबवून पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्याची भाषा कृतीत उतरवावी. पाकिस्तानला ठोकून काढावे, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनातील अग्रलेखातून केली आहे. ...
सीआरपीएफच्या ताफ्यावरील हल्ल्याचा सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहरचा निकटवर्तीय असून, त्यानेच हल्ल्याचा कट रचण्यापासून तो अमलात आणण्याची योजना आखली होती, असे स्पष्ट झाले आहे. ...
जम्मू काश्मीर येथील पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झालेत. देशातील प्रत्येक नागरिक अस्वस्थ आहे, उद्विग्न आहे. या हल्ल्याचा बदला घ्या, पुन्हा सर्जिकल स्ट्राइक करा, अशा तीव्र भावना व्यक्त होत आहेत. ...
शहीद झालेल्या ४० सीआरपीएफ जवानांचे मृतदेह त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात येणार आहेत. या सर्व शहिदांना गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ...
पाकिस्तानने तत्काळ सर्व दहशतवादी संघटनांना अभय देत पोसणे थांबवावे, असा कडक संदेश देत, अमेरिकेने जम्मू-काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केलेल्या दहशतवादी हल्ल्याचा धिक्कार केला. ...
दहशतवादाविरोधात भारताने आपली लढाई सुरू ठेवावी, तिला संपूर्ण सहकार्य व आवश्यक ती मदत करायला आम्ही तयार आहोत, असे रशियाचे प्रमुख व्लादिमीर पुतिन यांनी म्हटले आहे. ...