हैदराबादच्या एका कंपनीला १५ नोव्हेंबरपर्यंत या बसेस द्याव्यात, अशी अट सप्टेंबरमध्ये महापालिकेने घातली होती. मात्र, कंपनीने एकदम ४० बसेस देणे शक्य नसल्याचे सांगितल्याने आता टप्याटप्याने या बसेस मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
येत्या पंधरवड्यापासून सर्वच स्पेशल ट्रेन या पूर्वीप्रमाणे सुरू करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला असून, या निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. ...
शाळा सुरू केल्या. मात्र, बस कर्मचाऱ्यांच्या संपामुळे चिमूर आगारातील ग्रामीण भागातून जाणाऱ्या बस मात्र अजूनही बंद आहेत. दररोज भाडे खर्च करून जाणे परवडणारे नसल्याने पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवत नसल्याचे चित्र आहे. ...
बेकायदेशीर संपात सहभागी झाल्याच्या कारणावरून गडचिराेली, अहेरी व ब्रह्मपुरी या तीन आगारांतील १४ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये गडचिराेली आगारातील ३, अहेरी ६ व ब्रह्मपुरी आगारातील ५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ...
सोमवारी गणेशपेठेतील बसस्थानकारून एकही बस सुटली नाही. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. एसटीच्या संपाचा फायदा खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी घेतला आणि मनमानी भाडेवाड केली आहे. ...
दिवाळीपूर्वी ट्रॅव्हल्स चालकांनी तिकिटाचे दर वाढविले आहेत. त्यामुळे ग्राहकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे, तर दुसरीकडे डिझेल वाढल्याने तिकीट वाढविण्याशिवाय पर्याय नसल्याचे ट्रॅव्हल्स व्यावसायिक सांगताहेत. ...
दिवाळीत सर्वच रेल्वेगाड्यात अधिक पैसे घेऊन कन्फर्म तिकीट मिळत असल्याचे सांगितले जाते. दिवाळीत अनेकजण आपल्या मुलांसह प्रवास करीत असल्यामुळे ते सहज २०० ते ३०० रुपये अधिक देत असल्याचीही माहिती आहे. ...